नीरा देवघर प्रकल्पास 3976.83 कोटीची मंजुरी ,खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. राम सातपुते यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारणार/ बाळासाहेब सरगर
भूमीपुत्र न्यूज
वीर ,भाटघर धरणातील पाण्यापासून वंचित असणारी व कायमच दुष्काळी गावे म्हणून ओळखली जाणारी भोर तालुक्यातील 38 गावे ,खंडाळा तालुक्यातील 57 गावे, फलटण तालुक्यातील 51 गावे व माळशिरस तालुक्यातील 16 गावांना नीरा देवघर धरणातील पाणी बंदिस्त पाईपलाईन द्वारे मिळणार असून मंगळवार दि 31 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 3976 कोटी 83 लाख रुपयांची तरतूद केल्याने या भागातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
वीर धरणातील पाणी हे निरा उजवा कालव्याद्वारे खंडाळा ,फलटण ,माळशिरस सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना मिळत आहे तर भाटघर धरणातील पाणी हे बारामती इंदापूर या तालुक्यांना डाव्या कालव्याद्वारे तर फलटण, पंढरपूर, माळशिरस ,सांगोला या तालुक्यांना उजव्या कालव्याद्वारे मिळत आहे परंतु निरा उजव्या कालव्याद्वारे फलटण, माळशिरस, तालुक्यातील ज्या गावांना पाणी देता येत नव्हते त्या गावांसाठी 2007 साली तयार झालेल्या निरा देवघर धरणाच्या उर्वरित पाण्यातून पाणीपुरवठा करण्याचे प्रयोजन होते परंतु निधी अभावी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ही योजना सातत्याने गुंडाळून ठेवावी लागत होती परंतु माढा लोकसभेचे खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांच्या अथक प्रयत्नाने या योजनेस हिरवा कंदील मिळाला आहे.
निरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या माध्यमातून वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला जात होता परंतु त्यास यश मिळत नव्हते अखेर 31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी जवळपास 4000 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठीच्या निधीची तरतूद होऊन निविदा निघून मार्च अखेरीस या योजनेचे काम सुरू होणे अपेक्षित आहे.
शिंदे – फडणवीस सरकारने दुष्काळी भागातील जनतेच्या व्यथा ऐकून गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावला त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहे भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला होता त्यावेळीही तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेही याबाबतीत सहकार्य लाभले आहे तर सध्या खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ राम सातपुते यांच्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे यामुळे खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आ राम सातपुते यांचे गुढ्या उभारून स्वागत करणार .
बाळासाहेब सरगर ,अध्यक्ष निरा देवघर पाणी संघर्ष समिती .