डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश ;कोंडबावी गावात तब्बल 25 वर्षानंतर सुरू झाली एसटी बस
भूमीपुत्र न्यूज
कोंडबावी ता माळशिरस या गावाने तब्बल 25 वर्षानंतर लाल परीचे स्वागत केले असून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी कोंडबावी गावातील ज्येष्ठ नागरिक ,शालेय विद्यार्थी,महिला, शेतकरी, व्यापारी यांच्या मागणीची दखल घेऊन या गावात एसटी बस सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता अखेर या मागणीला यश आले असून तब्बल 25 वर्षानंतर गावात एसटी बस आली या एसटी बसच्या पहिल्या फेरीचे पूजन डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.
कोंडबावीत एसटी बस सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानण्यात आले तर एसटी बसचे चालक व वाहक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी रवींद्र यादव,देविदास पाटील,भानुदास खरात,चिरंजीव वाघमारे,सचिन पाटील,जयसिंग तरसे,सुरेश धाईजे,नामदेव माने,बापूराव कदम,दादासो मगर,सिद्धू साळवे,दत्तू रेवंडे,विजय थिटे,महादेव धाईजे,मोहन वाघमारे,दिलीप शिंदे,दत्तात्रय यादव,जनार्धन दांगट,शिवाजी नामदास,गोरख माने,दादा मदने,बाळू घाडगे,दत्तू माने,माऊली माने,पप्पू यादव,बापू बडे,परशुराम बिरलंगे,किशोर वाघमारे,अनिल थोरात,नामदेव सावंत,माऊली, वाघमारे,अनिल थोरात,अंकुश वसव,लक्षम्ण धाईजे,बाबा साठे,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात एसटी बस सेवा सुरू झाल्यामुळे गावातील शालेय विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामीण भागातील मुलींना व ज्येष्ठांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे या एसटी बसमुळे दळणवळणाच्या सुविधा सुलभपणे सर्वांना उपलब्ध होणार आहे गावात एसटी बस सुरळीत सुरू कशी राहील याची काळजी सर्वांनीच घ्यावी.
डॉ धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी