माळशिरस तालुकाराजकिय

पठाणवस्ती ग्रामपंचायतीत मोहिते पाटील पॅनलकडून शेतकरी ग्राम विकास आघाडीचा क्लीन स्वीप

भूमीपुत्र न्यूज / रशीद शेख

पठाणवस्ती ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहिते पाटील पॅनल व भाजपाचे एजाज पठाण यांची 196 मताधिक्याने निवड झाली.पठाणवस्ती ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी एकूण 9 जागा होत्या मोहिते पाटील पॅनलने सरपंच पदासह एकूण 9 पैकी 9 जागा जिंकून विरोधी शेतकरी ग्रामविकास आघाडीचा दणदणीत पराभव करून क्लीन स्वीप केल्याने नवनियुक्त सरपंच एजाज पठाण यासह सर्वच सदस्यांनी पठाण वस्ती येथे एकच जल्लोष केला.

या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार इम्तियाज पठाण ( 229 मते) ,जयश्री कनप ( 340 मते ),शितल पवार ( 349 मते ) ,अमीर शेख (251 मते ),मुमताज पठाण (297 मते ),केशर सरतापे (283 मते), अशोक सोनवणे (240 मते),तानाजी सुळ (247 मते),वनिता शेटे (237 मते ) या सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!