लावणी नृत्यांगना वैशाली जाधव व ढोलकीपटू पांडुरंग घोटकर यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर
भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील कलावंत वैशाली जाधव (परभणीकर) आणि सुप्रसिद्ध ढोलकी पटू पांडुरंग घोटकर (गुरुजी) यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी चे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात दोघांनाही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले यावेळी लावणी स्पर्धेचे सदस्य सुभाष दळवी,चंद्रकांत कुंभार,विजय शिंदे,महादेव अंधारे लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर,रेश्मा परितेकर,वर्षा परीतेकर मुसळे,ज्येष्ठ लावणी कलावंत राजश्री नगरकर,आरती नगरकर,छाया खुटेगावकर,अप्सरा जळगावकर,सुरेखा पवार,छाया,माया खुटेगावकर,वैशाली नगरकर मिना आमिना परभणीकर,ढोलकीपटु कृष्णा घोटकर हे उपस्थितीत होते.
भारत सरकारचा हा मानाचा पुरस्कार असून संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल दिला जातो सन २०१९ /२०२० /२०२१ या सालाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले यामध्ये अकलूज लावणी स्पर्धेतील लावणी कलावंत, महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी व सिने अभिनेत्री वैशाली जाधव हिस उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार तर महाराष्ट्राचे लाडके ढोलकीपटू पांडुरंग घोटकर गुरुजी यांना ज्येष्ठ कलाकार हा पुरस्कार जाहीर झाला विशेष म्हणजे या दोघांनाही अकलूज लावणी स्पर्धेतील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्काराने सन्मानित केले होते अकलूज लावणी स्पर्धेतील रेश्मा परितेकर व आरती नगरकर यांनाही यापूर्वी हा पुरस्कार मिळाला होता
मी आज या पुरस्काराची मानकरी ठरली ते केवळ अकलूज लावणी स्पर्धेमुळे अकलूज लावणी स्पर्धेमुळे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाची महाराष्ट्राची पहिली लावणीसम्राज्ञी ठरले मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तसेच अमेरिकेत महाराष्ट्राची लोककला लावणी सादर करण्याची संधी मिळाली आज मी इथेपर्यंत आले ते केवळ अनेकांच्या शुभेच्छा व अकलूज करांचे प्रेम विशेषता मोहिते पाटील कुटुंबाने दिलेले प्रोत्साहन व प्रेम यामुळेच हे मी यश मिळवू शकले.
वैशाली जाधव ,नृत्यांगना