वेळापूरच्या माजी जि.प. उपाध्यक्ष माने-देशमुख परिवारावर शोककळा: कै. सुमन चंद्रकांत माने-देशमुख यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज
वेळापूर (शेरी) येथील प्रतिष्ठित माने-देशमुख परिवारातील ज्येष्ठ सदस्या आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कै. सूर्यकांतदादा माने-देशमुख यांच्या भाऊजयी, कै. सुमन चंद्रकांत माने-देशमुख यांचे आज, मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्या वाईचे माजी आमदार कै. दादासाहेब जगताप यांच्या कन्या होत्या.
त्यांच्या निधनामुळे वेळापूर परिसरात शोककळा पसरली असून, माने-देशमुख आणि जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अंतिम दर्शन व अंत्यविधी:कै. सुमन चंद्रकांत माने-देशमुख यांच्या पार्थिवावर आज, १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता वेळापूर येथील त्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात 3मुले, एक मुलगी ,सूना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.




