श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या 7 संचालकांच्या फेर निवडणुकीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मागितला अहवाल
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या 7 संचालकांच्या फेर निवडणुकीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांना 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत अहवाल मागितला आहे याबाबत कारखान्याचे सभासद सालगुडे पाटील यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास कारखान्याचे 7 संचालकाची निवडणुकी द्वारे पदे भरण्याबाबत विनंती केली होती तर याच कारखान्याच्या महिला राखीव प्रतिनिधी नातेपुते व अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी इस्लामपूर हे 2 संचालक मयत झाले असल्याने त्यांच्या जागी कारखान्याने इतर 2 संचालकाच्या नेमणुका केल्या आहेत .
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर ता माळशिरस जिल्हा सोलापूर या सहकारी साखर कारखान्याच्या 7 संचालकांची पदे ही निबंधकांनी अपात्र ठरविल्यामुळे मा. मंत्री सहकार, पणन महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दाखल अपिलाबाबत सद्यस्थिती अवगत करावी तसेच श्री शंकर सहकारी साखर कारखाना हा 15/ 12 /2023 रोजी निवडणुकीस पात्र होणार असल्याने सदर कारखान्यातील 7 संचालकांची रिक्त पदे भरणे बाबत आपला सद्यस्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अभिप्राय प्राधिकरणास 10/2/ 2023 पर्यंत सादर करण्यात यावा अशा आशयाचे पत्र मा आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांना देण्यात आले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीपासूनच श्री शंकर सहकारी कारखाना या ना त्या कारणाने सतत चर्चेत होता 7 संचालकांची संचालक पदे निबंधकानी रद्द केल्यानंतर पुढे काय होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते डिसेंबर 2023 मध्ये या कारखान्याला पुन्हा पंचवार्षिक निवडणुकीसाठी सामोरे जावे लागणार आहे तत्पूर्वी “त्या” 7 संचालकांचे काय होणार ? याकडे सर्वांच्या सर्वांचे लक्ष लागले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे पंचवार्षिक निवडणूक , श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक, स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज ची पंचवार्षिक निवडणूक व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका या सन 2023 मध्ये असल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप व प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत .