विझोरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन समारंभ संपन्न

भूमीपुत्र न्यूज
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने मौजे-विझोरी (ता.माळशिरस) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन समारंभ मंगळवार दि 27 डिसेंबर रोजी संपन्न झाला.

या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील व कै. आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन विझोरीचे सरपंच पोपट काळे यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे होते.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सात दिवसात नवीन मतदार नोंदणी,रक्तदान शिबिर,ग्रामस्वच्छता,वृक्षारोपण जनजागृती व विविध विषयावरील व्याख्यानातून समाज प्रबोधन करण्यात येणार आहे.
सरपंच पोपट काळे यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले काॅलेजचे शिबीर आमच्या गावात घेऊन विद्यार्थी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करणार आहेत.त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्व मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघानासाठी विझोरी ग्रामपंचायतीचे सरपंच पोपट रामचंद्र काळे,उपसरपंच गणपत काळे,तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे,वर्षा बोरकर,जनाबाई शिंदे,प्रगतशील शेतकरी तानाजी इंगळे,शिवामृत चे संचालक मा नानासाहेब काळे,ग्रामसेविका गौरी लांडगे , नागरिक उपस्थित होते.पहिल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून सुरवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बापुराव अंकलगी यांनी केले तर बी.फार्मसी तृतीय वर्षातील ज्ञानेश्वरी ताटे व ऋतू साठे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले.आभार प्रा.महेश मिटकल यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,प्रा.रविराज जळकोटे,प्रा.स्नेहल काशीद,समाधान दुरापे,गिरीजा साळुंखे व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.




