वाढदिवसानिमित्त ग्रंथालय, पुस्तक पेढी, अभ्यासिकेचे लोकार्पण
भूमीपुत्र न्यूज
जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक नितीन बरडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्यशोधक विचारमंचतर्फे विविध लोकोपयोगी विधायक उपक्रम राबवून एक अनोखा संदेश दिला.बरडकरमळा, नातेपुते येथील विचार मंचतर्फे नितीन बरडकर यांचे आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक ग्रंथालय, पुस्तक पेढी व अभ्यासिका याचा लोकार्पण सोहळा आई वडील वसंत व कुसुम बरडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात 221 रुग्णांची नेत्र तपासणी व 40 रुग्णांना चष्मे प्रदान केले. सायंकाळी रागेश्री संगीत विद्यालय नातेपुते यांचा सदाबहार संगीत रजनी गायनाचा कार्यक्रम संगीत विशारद गायन मुकुंद गुळीग व तबला विशारद नागेश दीक्षित व विद्यालयाच्या शिष्यगणानी सादर केला.महात्मा ज्योतिबा फुले व सत्यशोधक समाज या विषयावर इतिहास अभ्यासक प्रशांत सरूडकर यांचे व्याख्यान तर प्रख्यात वक्ते बी एम पाटील सध्याची वाढदिवस पद्धती व वाढदिवसानिमित्त शुभचिंतन मनोगत झाले. तर 45 वटवृक्षांचे औक्षण करून वटवृक्षाचे दान करण्यात आले
या लोकार्पण कार्यक्रमाला पंचकोशीतील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद, आजी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थीती लावली. कार्यक्रम पार पाडण्या कामी सत्यशोधक विचार मंचाचे युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.