माळशिरस तालुकासामाजिक
चांदापुरी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज / रशीद शेख, चांदापुरी
चांदापुरी ता. माळशिरस येथे सरपंच जयवंत सुळ व उपसरपंच तात्यासाहेब चोरमले यांचे तर्फे मुस्लीम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव दिवसभर काहीही न खाता पिता उपवास धरत असतात सायंकाळी उपवास सोडणेसाठी इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सरपंच व उपसरपंच यांनी चांदापुरी चौकातील मशिदीवरती उपवास करणाऱ्या बांधवासाठी भोजनाची व्यवस्था करीत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला.
यावेळी सरपंच जयवंत सुळ , उपसरपंच तात्यासाहेब चोरमले , मौलाना सलीम रिजवी , युवानेते शाहिद शेख , मोहनखान पठाण , बाबु पठाण , खन्ना पठाण ,तोहिद बाबा शेख , अहमद पठाण , साजिद पठाण ,नवाज पठाण इ सह मुस्लीम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते




