निमगाव येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
भूमीपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथे शनिवार दिनांक 1 जून रोजी दुपारी 2 वा सुमारास निमगाव – पिलीव रस्त्यालगत राहणारा जवाहर बाळासाहेब काळे वय वर्षे 24 या तरुणाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत वेळापूर पोलिसात सुधीर विश्वनाथ लाळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 1 जून 2024 रोजी दुपारी 2 वा सुमारास सुधीर लाळगे हे त्यांच्या घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे मामा बाळासाहेब काळे यांच्या घरी आरडाओरडा ऐकू आल्याने लाळगे हे मामाच्या घरी गेले असता मामाच्या घरात मामाचा मुलगा जवाहर बाळासाहेब काळे यांनी घराच्या पत्र्याच्या लोखंडी अँगल ला साडी ने गळफास घेतल्याचे दिसले म्हणून लाळगे व त्यांचे मामा बाळासाहेब काळे यांनी जवाहर काळे यास लगेच गळ्याचा फास सोडून खाली घेऊन गावातील डॉ सचिन मगर यांच्या दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून पाहिले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला असे सांगितले यानंतर त्यांनी त्यास घरी घेऊन आले यानंतर वेळापूर पोलीस आल्याने मयत जवाहर काळे यास ग्रामीण रुग्णालय वेळापूर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
1 जून 2024 रोजी दुपारी 2 वा सुमारास माझ्या मामाचा मुलगा जवाहर बाळासाहेब काळे वय वर्षे 24 रा निमगाव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्याचे राहते घरी पत्र्याच्या लोखंडी अँगल ला साडी ने गळफास घेऊन मयत झाला असा जबाब सुधीर लाळगे यांनी वेळापूर पोलिसांना दिला .
भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली