सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मातंग बांधवांच्या जबाब दो आंदोलनास जाहीर पाठिंबा / डॉ. धवलसिंह मोहिते पाटील
भूमीपुत्र न्यूज
बुधवार दि 22 फेब्रुवारीपासून2023 पासून सकल मातंग समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे “जबाब दो” या नावाने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवार दि 21 रोजी पत्र काढून जाहीर पाठिंबा दिला आहे .
आझाद मैदान, मुंबई येथे सकल मातंग बांधवांच्या वतीने “जबाब दो” आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या असून यामध्ये मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड आरक्षण वर्गीकरण करावे ,अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण स्वतंत्र केंद्राची स्थापना करावी या प्रमुख मागण्यांसाठी जबाब दो आंदोलन मुंबई येथे करण्यात येत आहे या आंदोलनास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजक सकल मातंग समाजाला पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे .