अकलूज भूषण पुरस्कार जाहीर…अकलूजचे सुपुत्र दिग्दर्शक मकरंद माने व शाहीर राजेंद्र कांबळे यांना 2024 चे अकलूज भूषण पुरस्कार जाहीर
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने,अकलुज शहरातील व परिसरातील कला. क्रिडा, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, पत्रकारिता, विज्ञान, लोकप्रशासन, समाजसेवा, अध्यात्मीक, आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांना दरवर्षी “अकलुज भुषण” हा पुरस्कार दिला जातो. 2024 चा ” अकलूज भुषण ” पुरस्कार सिने क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध दिग्दर्शक मकरंद माने यांना व राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा सांस्कृतिक विभागातील पुरस्कार विजेते शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
स म कै.शंकरराव मोहिते-पाटील यांचे विचारांचा वारसा जपणारे, लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने,महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांचे वतीने सन 2023 पासून”अकलूज फेस्टिवल”आयोजन चालू केलेले आहे. या अकलूज फेस्टिवल मध्ये अकलूज आणि परिसरातील मान्यवरांना अकलूज भूषण पुरस्कार दिला जातो यावर्षीच्या अकलूज भूषण पुरस्काराचे हे दुसरं वर्ष असून यावर्षीच्या अकलूज भूषण पुरस्कारामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अकलूजचे सुपुत्र मकरंद माने व शाहीर राजेंद्र कांबळे यांना हा पुरस्कार दिला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रक काढून दिली.
2023 मध्ये अकलूजचे सुपुत्र व सद्या लंडन येथे स्थायीक असलेले वैज्ञानिक अमोल भंडारे यांना जाहीर केलेला “अकलूज भूषण” पुरस्कार हा 31 डिसेंबर 2024 रोजी मान्यवरांचे हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.