मा आ राम सातपुतेंकडून ज्येष्ठ नेते के एम पाटील यांचा सत्कार …राजकीय तर्क वितर्काना उधाण…
भूमीपुत्र न्यूज
अकलूजचे माजी सरपंच, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व अकलूजचे बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर सिंह माने पाटील यांचा आज 31 डिसेंबर रोजी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त माळशिरसचे मा आ राम सातपुते यांनी अकलूज येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान केला मा आ राम सातपुते यांच्याकडून ज्येष्ठ नेते के एम पाटील यांचा झालेला सन्मान आणि यानंतर समाज माध्यमांवर सत्काराचे व्हायरल झालेले फोटो पाहून अनेक राजकीय तर्क वितर्क लढविले जात आहेत.
मा आ राम सातपुते यांनी के एम पाटील यांचा वाढदिवसानिमित्त जरी सत्कार केला असला तरी या सत्कार सोहळ्यास अकलूजच्या माने पाटील परिवारातील तरुण नेत्यांची फळी आवर्जून उपस्थित होती यामध्ये बागेवाडी चे माजी उपसरपंच हंसराज माने पाटील, युवा उद्योजक व भाजपाचे नेते सुजयसिंह माने पाटील, जयराज माने पाटील, क्रांतिसिंह माने पाटील, पंपू भोसले , भाजपाचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, तुकाराम साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
गत विधानसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील व मा आ राम सातपुते यांच्यात सातत्याने शाब्दिक खडाजंगी होत असताना मा आ राम सातपुते यांनी मोहिते पाटील परिवारातील जवळच्या सदस्याच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसानिमित्त सत्कार केल्याने ज्येष्ठ नेते के एम पाटील यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार ? याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत