माळशिरस तालुका

महसूल सप्ताहनिमित्त माळशिरस तहसीलच्या वतीने आजी-माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या माता-पित्यांचा गौरव समारंभ संपन्न

भूमीपुत्र न्यूज

महसूल सप्ताह निमित्त माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने युवा सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमांतर्गत शनिवार दि 5 ऑगस्ट 2023 रोजी माळशिरस तालुक्यातील आजी-माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या माता-पित्यांचा सन्मान अकलूजचे प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी प्रशासनामार्फत आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या प्रशासनाच्या विविध विभागाशी निगडित असलेल्या त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी विविध विभागांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते विविध विभागाचे प्रतिनिधी व आजी-माजी सैनिक यांची समन्वय समिती बनवून त्या मार्फत अडचणींचे निपटारा करण्याचे ठरले यावेळी संपूर्ण तालुका भरातून आजी-माजी सैनिकांमार्फत त्यांच्या अडचणी संदर्भात 40 अर्ज प्राप्त झाले माळशिरस तालुक्यातील इतर गावातही मंडल अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत आजी-माजी सैनिकांचा गौरव करून त्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या याचबरोबर विविध महसुली योजनांची माहिती त्यांना देण्यात आली महसूल सप्ताहाच्या निमित्ताने माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आजी-माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयाचे यावेळी आभार मानण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!