पिलीव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शाहरुख मुलाणी यांची निवड
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पिलीव पत्रकार संघाच्या २०२५ च्या पदाधिकारी निवडीसाठी आज संघाचे विद्यमान अध्यक्ष अतुल नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी शाहरुख मुलाणी यांची तर उपाध्यक्षपदी संजय रोकडे,कार्याध्यक्षपदी प्रा. संजय पाटील तर सचिवपदी गणेश देशमुख व संघटक म्हणून सतिश पारसे यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,अतुल नष्टे,प्रमोद भैस,सुजित सातपुते,उदय कदम ,विश्वजीत गोरड,रघुनाथ देवकर आदी सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पिलीव पत्रकार संघाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न,बँका ,प्रलंबित रस्ते,पूल व ऊस वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यासारख्या अनेक विषयांवर आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे यापुढेही आपण पदाचा उपयोग पिलीव परिसरातील विविध प्रलंबित विषयांवर लक्ष वेधण्यासाठी करणार असल्याचे नूतन अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी सांगितले.
पिलीव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाहरुख मुलाणी व इतर पदाधिकाऱ्यांचे माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी फोन करुन अभिनंदन केले.