ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वेळापूर पोलीसांनी वेळापुर येथे बालकामगारची केली सुटका
भूमीपुत्र न्युज
वेळापूर पोलीस ठाणे हद्दीत काही हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या हॉटेलमध्ये बालकामगार ठेवले असले बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी ,नारायण शिरगावकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी तसेच पो उपनिरीक्षक शेळके पो हे का/आनंदपुरे, देशपांडे, कदम यांनी वेळापूर पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कारवाई करीत वेळापूर येथील सांगोला रोड येथे असणाऱ्या हॉटेल नंदिनी येथे एका बालकामगारांची सुटका केली.
संबंधित हॉटेल नंदिनी चे मालक 1)अनिल दामोदर व्यवहारे रा.वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर 2) ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे रा.वेळापूर शेरी ता.माळशिरस जि.सोलापूर यांचेवर दिनांक 31/12/2024 रोजी वेळापूर पोलिस ठाणे येथे बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम 1986 (3),14, अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 कलम 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपले परिसरातील हॉटेल व अन्य आस्थापना येथे बालकामगार यांना कोणीही कोणत्याही प्रकारचे कामावर ठेवले असल्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वेळापूर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्यात यावा आपले नाव गोपनीय ठेवली जाईल.
भाऊसाहेब गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापूर पोलीस स्टेशन