निमा संघटनेच्या नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन(NCISM) सदस्यपदी डॉ.तानाजी कदम तर सदस्य नोंदणी समितीवर डॉ.मिलिंद गुळभिले यांची निवड
भूमीपुत्र न्यूज
सेन्ट्रल निमा संघटनेची नूतन कार्यकारणीची निवड नुकतीच झाली असून त्यामध्ये निमा अकलूज शाखेचे माजी एमसीआयएमचे सदस्य डॉ.तानाजीराव कदम यांची सेंट्रल निमाच्या नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन(NCISM) कमिटीवरती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.त्यांनी निमा संघटनेसाठी गेली अनेक वर्षे कार्य केलेले आहे व बीएएमएस डॉक्टरांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच ते एमसीआयएम सदस्यपदी बहुमताने निवडून आले होते त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच डॉ.मिलींद गुळभिले यांची निमा संघटनेच्या सदस्य नोंदणी समितीवर निवड झाली आहे.डाॅ.गुळभिले यांनी यापूर्वी निमा संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष, सोलापूर जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर जाॅईंट सेक्रेटरी तसेच राज्य व केंद्रीय आरोग्य समितीवर सदस्य म्हणून काम केलेले आहे.सन 2012 पासून ते केंद्रीय समितीवर प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.
त्यांच्या या निवडी बद्दल निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,उपाध्यक्ष डॉ.उदय माने-देशमुख,सचिव डॉ.दादासाहेब पराडे-पाटील व प्रसिद्धी प्रमुख डॉ.प्रशांत निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार केला.तसेच त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.