माळशिरस तालुका

स्वाभिमानीचे विविध मागण्यासाठी माळशिरस तालुक्यात रस्ता रोको आंदोलन

भूमीपुत्र न्यूज

स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विविध मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर चक्का जाम चे आयोजन केले होते माळशिरस तालुक्यात वेळापूर येथे स्वाभिमानीचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिरासमोर व वेळापूर पोलीस स्टेशन नजीक मुख्य रस्त्यावरच रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या .

यावेळी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी आंदोलन कर्त्यांची बाजू ऐकून वाहतूक सुरळीत केली आंदोलनकर्त्यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन वेळापूरचे मंडल अधिकारी रणसुभे , महावितरण चे उप अभियंता मोटे स्वीकारले यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर- माने देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, मगन काळे,विधानसभा प्रमुख साहिल आतार, तालुका उपाध्यक्ष दत्ता भोसले सोमनाथ पिसे, वेळापूर ग्रामपंचायत सदस्य अमृतराज माने- देशमुख ग्रामपंचायत सदस्य राऊत ,वेळापूर शहराध्यक्ष सचिन पवार, सचिन देवकते ,अमरसिंह माने -देशमुख, शिवराम गायकवाड ,सिराज तांबोळी समाधान काळे ,अहिल पठाण ,तेजस भाकरे, विकास घुले, विलास काळे, शिवाजी वाघमारे, विजय वाघबंरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

महावितरण ने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ बंद करावी, थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करावे ,उसाची थकीत एफ आर पी व त्यावरील व्याज द्यावे, रासायनिक खताच्या किमती नियंत्रित कराव्यात, कापूस व सोयाबीनला 12 हजार रुपये हमीभाव द्यावा ,बुलढाणा येथे शेतकऱ्यांवरती अमानुषपणे केलेल्या लाठी चार्ज ची खातेनिहाय चौकशी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनास गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल .
अजित बोरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!