माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

पालखीतळ वेळापूर येथे दोन दहशतवादी… वेळापूर पोलिसांची चोख कारवाई

भूमीपुत्र न्यूज

महादेवाची नगरी म्हणून ज्या गावाची ओळख आहे त्या वेळापूर पालखी चौकात गुरुवार दि 26 जून रोजी दोन दहशतवादी असल्याची माहिती वेळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथ, दंगा नियंत्रण पथक ,जलद प्रतिसाद पथक, अग्निशामक दल, दंगा नियंत्रण पथक आदी यंत्रणा कार्यान्वित करून सदर ठिकाणी कारवाई केली.

वेळापूर पोलिसांना दोन दहशत वाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सगळ्या यंत्रणा कार्यान्वित झाल्या.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम याच ठिकाणी असतो. यावेळी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांसह भाविक मोठ्या भक्ती भावाने येतात .याचबरोबर नेहमीच या ठिकाणी गर्दी व वर्दळ असते .याच ठिकाणी पालखीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्याने सर्व यंत्रणा खडबडून जाग्या व कार्यान्वयीत झाल्या.

आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने प्रत्यक्ष कधी दहशतवादी हल्ला झालाच तर पोलीस जवानांना अनुभव असावा यासाठी त्यांचा सराव व्हावा म्हणून पालखीतळ वेळापूर येथे गुरुवारी दुपारी मॉक ड्रिल घेण्यात आले वारी काळात भाविकांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध यंत्रणा किती सज्ज आहेत तसेच दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत व उपायोजनाबाबत पालखीतळ वेळापूर येथे सराव घेण्यात आला मात्र दहशतवादी असल्याच्या नाट्यरुपांतराने सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याचे दिसून आले यावेळी या सरावाचे मॉक ड्रिलचे नेतृत्व वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी सदर मॉक ड्रिल मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर, जलद प्रतिसाद पथक ,अग्निशामक दल, दंगा नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलिस अमलदार यांनी सहभाग घेतला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!