माळशिरस तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीची मतमोजणी मंगळवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वा होणार सुरू
भूमीपुत्र न्यूज
रविवार दि 18 डिसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 107672 मतदारांपैकी 86155 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला असून 34 ग्राम पंचायतींचे सरासरी 80%एवढे मतदान झाले असून ही मतमोजणी मंगळवार दि 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वा नवीन शासकीय धान्य गोडाऊन, म्हसवड रोड ,माळशिरस या ठिकाणी होणार असल्याची माहिती माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली .
मतमोजणी एकूण 11 फेऱ्यांमध्ये 12 टेबलांवर होणार आहे पहिल्या फेरीमध्ये पुरंदावडे ,चौंडेश्वरवाडी, चांदापुरी या तीन गावांचा समावेश असेल दुसऱ्या फेरीमध्ये इस्लामपूर, गुरसाळे व तरंगफळ या तीन गावांचा समावेश असेल फेरी क्रमांक तीन मध्ये तिरवंडी, जांभूड व मोटेवाडी या गावांचा समावेश असेल समावेश असेल फेरी क्रमांक चार मध्ये पठाणवस्ती, कोळेगाव ,पाणीव या तीन गावांचा समावेश असेल फेरी क्रमांक पाच मध्ये आनंदनगर, मेडद, संगम या तीन गावांचा समावेश असेल फेरी क्रमांक सहा मध्ये बागेचीवाडी तामशीदवाडी, मारकडवाडी या गावांचा समावेश असेल फेरी क्रमांक सात मध्ये सदाशिवनगर, पिसेवाडी ,उघडेवाडी लोंढे मोहितेवाडी या गावांचा समावेश असेल फेरी क्रमांक मध्ये आठ मध्ये काळमवाडी, धानोरे ,कचरेवाडी, उंबरे दहीगाव या गावांचा समावेश असेल फेरी क्रमांक नऊ मध्ये फळवणी, पळसमंडळ ,माळेवाडी बोरगाव, तांबेवाडी या गावांचा समावेश असेल समावेश असेल मध्ये फेरी क्रमांक दहा मध्ये खंडाळी, निमगाव या गावांचा समावेश आहे फेरी क्रमांक 11 मध्ये यशवंतनगर ,वेळापूर या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे मतमोजणी 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वा सुरू होणार असून प्रत्येक फेरीसाठी अंदाजे 30 मिनिटे वेळ लागणार असून होणाऱ्या 11 फेऱ्यांसाठी जवळपास 5 ते 6 तासाचा वेळ लागू शकतो यामुळे सकाळी 9.00वाजता सुरू होणारी मतमोजणी अंदाजे दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत पूर्ण होऊ शकते .