दूध दर पूर्ववत करा… अन्यथा दूध संघाच्या मालकांना रस्त्यावर फिरू देणार नाही / संतोष राऊत
गाईला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीसाठी शिवसेनेचे अनोखे आंदोलन
भूमीपुत्र न्यूज
कोरोनाच्या संकटातून शेतकरी सावरत असताना वादळी वारे,अवकाळी पावसाने, गारपिटीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केले आहे यातच शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंद्याच्या माध्यमातून शेतकरी आपला कसाबसा उदरनिर्वाह करीत असताना दूध संघाच्या मालकांनी संगणमताने दुधाचे दर पाडले असून बळीराजा पुन्हा एकदा कोलमडला आहे यामुळे येत्या आठ दिवसात दूध संघाच्या मालकांनी जर दुधाचे दर पूर्ववत केले नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) माळशिरस तालुका प्रमुख संतोष राऊत यांनी खुडूस ता. माळशिरस येथे दिला.
ते शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने आळंदी -पंढरपूर पालखी महामार्गावर खुडूस नजीक दूध दरवाढीसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी शिवसेनेच्या वतीने गाईस दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.यामुळे आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाच्या चकाचक रस्त्यावर सर्वत्र दूधच दूध दिसत होते.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साहिल आतार यांनी पाठिंबा दिला.शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे दूध संघ मालक येत्या आठ दिवसात काय निर्णय घेणार ? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.चारा व पशुखाद्याचे वाढते दर पाहता दुधास अत्यल्प दर मिळत असल्याने बळीराजा ज्या दुधाच्या जोड धंद्यावर आपला उदरनिर्वाह करीत होता तोही दूध धंदा मोडकळीस झाल्याने शेतकऱ्याचे जगणे मुश्किल झाले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
यावेळी जेष्ठ शिवसैनिक महादेव बंडगर ,सतिश कुलाळ यांनी आपले मनोगत वेक्त केले. या आंदोलनाला केशव ठवरे ,महादेव लोखंडे, बाबा पाटील, बाबासाहेब फडतरे, ब्रह्मदेव डोंबाळे ,गोटू पाटील , प्रताप मगर, गोरख पवार, नागनाथ मगर, बापू कदम, पप्पू मिसाळ, बापु मोटे, शिवाजी हांडे, कल्याण मोटे, सचिन तरंगे ,धनाजी पाटील, प्रताप ठवरे, शंकर डोंबाळे, नेताजी पाटील ,शंकर कुलाळ, रोहन ठवरे, तुळशीराम ठवरे, तुकाराम बनकर , प्रताप पवार ,संतोष मोटे राहुल वाघमोडे ,रज्जाक मुलानी ,शिवाजी चौगुले आदी शेतकरी बांधव आंदोलनास उपस्थित होते .माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन वाघमोडे यांनी मानले.