माळशिरस तालुकाशैक्षणिकसामाजिकसोलापूर जिल्हा

कोळेगांवचा ऋग्वेद बेंदगुडे AIIMS मदुराईत

माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडून सत्कार

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ऋग्वेद रवींद्र बेंदगुडे याने नीट २०२५ या देशपातळीवरील कठीण परीक्षेत चमकदार यश मिळवत आपला ठसा उमटवला आहे. ऋग्वेदने ५७६ गुण मिळवत अखिल भारतीय क्रमवारीत ४२७५ वा रँक मिळवला असून त्याला प्रतिष्ठित AIIMS मदुराई(तमिळनाडू) येथे एम.बी. बी.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला आहे.

राजस्थानमधील कोटा येथील ॲलेन या नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिवसरात्र कठोर परिश्रम करून ऋग्वेदने हे यश मिळवले आहे. त्याच्या चिकाटीला, सातत्यपूर्ण अभ्यासाला आणि कुटुंबीयांच्या पाठींब्याला हे यश लाभले असल्याचे ऋग्वेद बेंदगुडे याने सांगितले.या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ऋग्वेदचा सत्कार करून अभिनंदन केले.

या वेळी बोलताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, “गावातील मुलगा राष्ट्रीय स्तरावर यश मिळवतो, हे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यात तज्ञ डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी अपेक्षा आ.जानकर यांनी व्यक्त केली.

ऋग्वेद बेंदगुडे याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, माझ्या या यशामागे माझे आई-वडील, नातेवाईक, शिक्षक तसेच सर्व मित्रपरिवाराचा आधार आयुष्यभर लक्षात राहील.
याप्रसंगी वेळापूर च्या माजी सरपंच विमलताई जानकर, जीवन जानकर, डॉ.आर.डी. बेंदगुडे आणि डॉ. रूपाली बेंदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!