सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निमगावचे बाळासाहेब मगर
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माळशिरस तालुक्यातील निमगावचे बाळासाहेब अप्पासाहेब मगर यांची निवड सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार यांनी केली व नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे देण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड अर्जुनराव पाटील, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड गजेंद्र खरात, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रुपनवर, माळशिरस तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष दादासाहेब वाघमोडे- पाटील, अशोक केळकर, मारुती ढबरे, बाळासाहेब वाघमोडे, सौदागर खांडेकर, बाळकृष्ण वाघमोडे, हरिश्चंद्र लोखंडे, सुधाकर कांबळे, लता ढेबर , देवेंद्र सैनसाखळे आदी उपस्थित होते.
यापूर्वी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी मी काम केले होते माझ्या कामाची पोचपावती म्हणून माझी पक्षाने वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे पक्षाची ध्येय धोरणे व काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर ,वरिष्ठ कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार .
बाळासाहेब मगर, वरिष्ठ उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी