निमगावात शेख यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्रे केले ठार
भूमीपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथे बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून जून 2023 या महिन्यापासून अस्तित्वात असणारा हा बिबट्या निमगावच्या पूर्वेच्या भागाकडून पश्चिमेच्या भागाकडे वास्तव्यास आला असून निमगाव- तरंगफळ रोडवरील सिकंदर शेख यांच्या पाळीव कुत्र्यावर बुधवार दि 5 जुलै रोजी रात्री 11.30 वा च्या दरम्यान पाळीव कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याला फरफटत शेजारील उसात ओढून नेऊन ठार केले आहे . यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या अगोदर या बिबट्याने निमगाव मळोली रोडवरील पाळीव कुत्र्यासह बकऱ्यावर हल्ला करून केला होता यानंतर या बिबट्याने निमगावच्या पश्चिमेस आपले वास्तव्य केले असून गावच्या पश्चिमेस असणाऱ्या निमगाव तरंगफळ रोडवरील सिकंदर अकबर शेख यांच्या पाळीव कुत्र्याला ठार केले असून अर्धवट खाल्ले आहे व त्याच अवस्थेत उसात सोडून दिले आहे वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद करावा असे मागणी नागरिकांतून होत आहे .
6 जून 2023 पासून निमगावात दिसणाऱ्या या बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला होत आहे या संदर्भात या अगोदरही वन विभागाला व संबंधित यंत्रणांना बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी लेखी पत्र दिले आहे सध्या बिबट्याचा वावर वाढलेला दिसून येत असून तो पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे परंतु भविष्यात बिबट्याच्या माध्यमातून मनुष्यहानी देखील होऊ शकते याचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकारी ,जिल्हा वनअधिकारी तालुका वनपरिक्षेत्राधिकारी ,प्रांताधिकारी, तहसीलदार आदी सर्व संबंधित यंत्रणांना ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र देऊन या बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी करणार आहे .
सुभाष साठे ,सरपंच निमगाव म.