…अन श्रीलेखा पाटील यांनी केली “चाय पे चर्चा “

भूमीपुत्र न्यूज
शनिवार दि. 28 जानेवारी वेळ सकाळी 11.15 ची माळशिरस मधील अहिल्या चौकात सगळीकडेच लगबग व गडबड सुरू होती …चौकातील शिवाजी सकपाळ यांच्या रेणुका हॉटेल समोर एक भली मोठी गाडी येऊन थांबली…. त्या गाडीतून एक महिला खाली उतरल्या आणि थेट रेणुका हॉटेलमध्ये शिरल्या आणि स्वतःच्या हातानेच हॉटेल रेणुकातील बिस्कीट पुडे घेऊ लागल्या या अगोदरच या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी बसलेले माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख , पत्रकार निनाद पाटील, उदय कदम व विजयकुमार देशमुख यांनी या महिलेला पाहताच नमस्कार केला या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्या होत्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित श्रीराम शिक्षण संस्थेच्या सचिवा श्रीलेखा पाटील.

सडेतोड व तोंडावरच समोरच्याला जे काही आहे त्या बोलणाऱ्या “वहिनी” व “मा” म्हणून त्या सर्वदूर परिचीत आहेत. पत्रकार व वहिनी भेटल्यावर चर्चा तर होणारच…. मग चहा घेणार का ? म्हटल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता हो घेणार… म्हणत चहा घेत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरे तर दिलीच मात्र स्वतःच्या हाताने घेतलेलं बिस्कीट पुढे एवढे कशाला घेतले ? असा प्रश्न विचारला त्यावेळी मी माझ्या लेकींना भेटायला चालली आहे मग मोकळ्या हाताने काशी जाऊ ? म्हणून मला जी बिस्किटे हवी आहेत ती घेतली अस उत्तर दिलं परंतु या उत्तरानं अनेक प्रश्नांची उकल करून दिली …

माणूस कितीही मोठा झाला तरी आपली संस्कृती ,रितीरिवाज परंपरा न विसरता एखाद्याच्या घरी जाताना मोकळ्या हाताने जायचे नसते हा संदेश त्यांनी या माध्यमातून तर दिलाच पण एवढ्या मोठ्या संस्थेच्या सचिवा, दिवंगत माजी आमदार शामराव पाटील यांच्या स्नुषा , काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या अर्धांगिनी पण त्यांचं वागणं व राहण जमिनीवरच… सुलभपणे साधेपणा व आपुलकी जपत आपणही सर्वसामान्य आहोत वेगळं कोणीही नाही हे दाखवत उपस्थित पत्रकारांना “अश्वासन” देत चाय पे चर्चा केली दिलेला संदेश व केलेली चर्चा उपस्थित पत्रकारांच्या कायमच स्मरणात राहील




