मांडवे येथील” जेवण वाडा” या नूतन हॉटेलचे आ राम सातपुते यांच्या हस्ते उदघाटन

युवा उद्योजक वैजनाथ ढोपे व पप्पू चव्हाण यांनी ग्रामीण “वाडा” संस्कृतीचे घडविले दर्शन
भूमीपुत्र न्यूज
मांडवे ता माळशिरस येथील युवा उद्योजक वैजीनाथ ढोपे व पप्पू चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून माळशिरस तालूक्यातील मांडवे(50 फाटा) पुणे-पंढरपूर मार्गालगत ग्रामीण संस्कृतीला शोभेल असे उभारण्यात आलेल्या “जेवण वाडा” या नूतन हॉटेलचे उद्घाटन आ राम सातपुते यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे, फोंडशिरस गावचे सरपंच पोपट बोराटे, मांडवे गावचे सरपंच तानाजी टिळे, सावता ढोपे, संपत ढोपे, सुनील गोरे, तानाजी पालवे, जयवंत पालवे, राहुल पालवे, अमोल शिंदे, बंडू पालवे, बिट्टू शिंदे, सतीश बंडगर, मयूर झाडबुके, कृषी अधिकारी नवनाथ गोरे, सागर ढोपे, संदीप पवार, राजेंद्र पांढरे, शिवाजी कुंभार, डॉ. तुकाराम दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अस्सल गावाकडील पंगत (भारतीय बैठक) ने प्रसिद्ध आणि सुसज्ज असलेले हॉटेल जेवण वाडा च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी जेवण वाडा या हॉटेलचे कौतुक केले असून ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास होत चालला असून हीच संस्कृती जपण्याचे काम युवा उद्योजक वैजनाथ ढोपे व पप्पू चव्हाण करीत असून तरुणांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मान्यवरांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्वांचीच स्नेहभोजनाची व्यवस्था हॉटेल मालक वैजीनाथ ढोपे व पप्पू चव्हाण यांच्या वतीने करण्यात आली होती.





