शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका समन्वयक पदी रणजित गायकवाड
भूमीपुत्र न्यूज
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माळशिरस तालुका समन्वयक पदी बागेचीवाडी ता माळशिरस येथील रणजित गायकवाड यांची निवड शिवसेना वैधकीय मदत कक्ष प्रमूख राम राऊत यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या समन्वयक पदी रणजित गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब ,गरजू ,आर्थिक, दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालय राखीव खाटा उपलब्ध करून देणे ,निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे या संदर्भात योग्य मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर राहावे अशी माहिती देण्यात आली आहे गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करण्याकरिता गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोपरी, ठाणे येथे मुख्य कार्यालय करण्यात आलेले आहे या माध्यमातून आपण माळशिरस तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार करून देणार असल्याची माहिती नूतन माळशिरस तालुका समन्वयक रणजीत गायकवाड यांनी दिली.