छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोळेगांव येथील स्वराज्य ग्रुप व राजे ग्रुप यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
भूमीपुत्र न्यूज
कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील स्वराज्य ग्रुप,सटवाई मळा व राजे ग्रुप एसटी स्टँडकोळेगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्य ग्रुप च्या वतीने सटवाई मळा येथे सोमवार दि १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता ध्वजरोहन व मूर्ती पूजन तसेच सकाळी ठीक १० वाजता चित्रकला स्पर्धा दोन गटात घेतल्या जाणार आहेत.लहान गट १ ली ते ४ थी मोठा गट ५ वी ते ८ वी असून सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.मंगळवार दि २० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होणार असून स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.
या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या हस्ते देण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष निनाद पाटील
असणार आहेत.
तसेच राजे ग्रुप एसटी स्टँड कोळेगाव ता. माळशिरस येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भरगच्च विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि 17 फेब्रुवारी रोजी कोळेगावच्या सरपंच सौ रजनी दुपडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम ठिकाणी मूर्ती स्थापना होणार आहे .
तसेच रविवार दि 18 फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी मूर्ती पूजन व शिवपाळणा,मंगळवार दि 20 फेब्रुवारी चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर सायंकाळी रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान गट तसेच बुधवार 21 फेब्रुवारी रोजी मोठ्या गटासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत .गुरुवार दि 22 फेब्रुवारी रोजी सर्व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तर शुक्रवार दि 23 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक घोडे,रथ,हलगी, सुरसनई ताफा व रंगीत फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये काढण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजे ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
राजमुद्रा ग्रुप कोळेगाव चे सर्व कार्यकर्ते किल्ले प्रतापगड येथून कोळेगाव पर्यंत पायी ज्योत आणणार असून त्यांचे हे चौथे वर्ष आहे.