माळशिरस तालुका

तोंडले येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भूमीपुत्र न्युज

विज बिल थकबाकी वसुली करण्यास गेले असता एका ठिकाणी विज चोरी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने सदर वीज ग्राहकाने महावितरणचे कर्मचारी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महावितरण कंपनीकडून एक दिवस एक गाव हा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये एका गावात दिवसभर महावितरणचे कर्मचारी गावातील वीज बिलाची थकबाकी जमा करणे,तारांचे लूज गाळे ओढणे,विजेच्या तारांना चिटकत असलेले झाडांच्या फांद्या ,वेली तोडणे, रोहित्र(डीपी) मधील फ्यूज व्यवस्थित करणे यासारखे कामे करण्यात येत असून तोंडले ता माळशिरस येथे घरगुती विज थकबाकी वसुली करीत असताना कै. चांगदेव दगडु चव्हाण यांचे घराजवळ बोंडले शाखेचे कनिष्ठ अभियंता आनंद भोई,लाईनमन बंडु कोळी,वायरमन सोमनाथ शिंदे,विद्युत सहाय्यक शहाजी थिटे,सचिन कांबळे,श्रीराम शिवाजी सुतार ,कु.शितल सगर,निलेश जाधव,रामदास गायकवाड,उस्मान मुलाणी,नारायण कदम,धनंजय नारदवार, ज्ञानेश्वर भुसे,शिवचंद भोयर,नागनाथ जाधव हे कर्मचारी चव्हाण यांच्या घराबाहेर लावलेले लाईट चे मीटर चेक करीत असताना विज चोरीबाबत संशय आल्याने मिटरला जोडलेली वायर चेक केली तेव्हा मयत चांगदेव दगडू चव्हाण यांचे नावावर असलेले मिटरमध्ये छेडछाड करुन विज चोरी करत असल्याचे दिसले .

म्हणुन महावितरण च्या कर्मचारी यांनी सर्व्हिस वायरवर लावलेला टॅब काढुन वायर मिटर मध्ये व्यवस्थीत जोडली व चांगदेव दगडु चव्हाण यांचा मुलगा धनराज चांगदेव चव्हाण यांना तुम्ही आत्तापर्यंत चोरुन वापरलेल्या विजेचे बिल व तडजोड बील तुम्हाला भरावे लागेल असे सांगितले.त्यानंतर सर्व स्टाफसह 500 मीटर अंतरावर असलेल्या उजनी कॅनल पट्टीवर मारुतीचे मंदिराजवळ, धनाजी सुखदेव चव्हाण यांचे घरासमोर सर्व कर्मचारी आले असता तेथे तोंडले गावातील शहाजी रामचंद्र चव्हाण याने पाठीमागुन मोटार सायकलवरुन येवून महावितरण चे कर्मचारी शहाजी थिटे यांच्या मोटार सायकलला त्याची मोटार सायकल आडवी लावुन तुम्ही माझा पुतन्या धनराज चांगदेव चव्हाण याचे घरची लाईट का बंद केली असे म्हणून शिविगाळी करु लागला.महावितरण चे कर्मचारी त्यास समजावुन सांगत असताना त्यांनी विद्युत सहाय्यक शहाजी थिटे यांच्या शर्टाचे गच्चीला धरुन धक्काबुक्की करु लागल्याने कर्मचारी यांनी सोडवा सोडवी करीत असताना शहाजी चव्हाण यांने “तु कशाचे बील घेतो “असे म्हणुन शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा केला आहे.
त्यानंतर घडलेल्या प्रकारची पोलिसांकडे तक्रार केल्यास तुला खूप जड जाईल अशी धमकी दिली. याबाबत वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!