माळशिरस तालुका

बहुगुणी चिघळ भाजीला वाढली मागणी

भूमीपुत्र न्यूज

रासायनिक खतांचा वारेमाप वापर करून पिकविलेल्या अनेक भाज्या चवीने खाऊन अनारोग्याने त्रस्त झालेली माणसं आता अस्सल गावरान भाझ्याकडे वळत असल्याचे चित्र अकलूज परिसरात दिसत आहे. घोळ, चिघळ व चिवळ असे नामावली असलेली गावरान भाजी अकलूजच्या भाजी मंडईत आजकाल भलताच भाव खातो आहे. कवडीमोलाने विकणारी ही रानभाजीला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

अनेक जीवनसत्त्व, तंतू खाद्य व प्रथिने मुबलक असलेली ही भाजी अनेक विकारांना दूर ठेवते. या रानभाजीत अ व ब जीवनसत्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मेग्नेशियम, आयर्न (लोह), तांबे (काॅपर), मॅंगनीज इत्यादी क्षार मुबलक प्रमाणात आढळतात. कमी कॅलरीज असलेल्या या भाजीत मेद (फॅट) व कोलेस्टेरॉल शून्य प्रमाणात असते. चिगळाची भाजी आपणास अन्नपचनास मदत करते त्यामुळे यकृत निरोगी राहते. अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. या भाजीत हृदयाला घातक असलेले कोलेस्टेरॉल नसल्यामुळे हृदायाघातापासून संरक्षण होते. हीमोग्लबिनचे प्रमाण वाढण्यास तसेच वजन कमी करण्यासाठी या भाजीतील क्षारांचा चा उपयोग होतो. मूत्रमार्ग सुरक्षित राहून लघवीला साफ होते व मूळव्याध कमी करण्यास उपयुक्त होते.

बदलत्या काळानुसार शेती व्यवसायात अमाप प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या रासायनिक खतांमुळे चिगळ ही रानभाजी संकटग्रस्त झाली आहे. पूर्वी निकोप वाढ असणाऱ्या या भाजीची वाढ खुंटली आहे. मातीतील सुपिकता कमी झाल्यामुळे एरवी मुबलक प्रमाणात वाढणरी ही भाजी दुर्मिळ होत चालली आहे.

तानाजी पिसे, तरकारी उत्पादक, यशवंतनगर (अकलूज)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!