जगात आपोआप काही घडत नसतं तर ते घडवाव लागत / ॲड एम एम मगर
भूमीपुत्र न्यूज
दुबई हे जागतीक उद्योगधंद्याचे व नवनिर्मितीचे केंद्र आहे तेथील उद्योगविश्व,राहाणीमान,कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता,मोठ मोठ्या टोलेजंग बहुमजली इमारती, आधुनिक तंत्रज्ञान,खाण्या – पिण्याच्या,राहाण्याच्या पध्दती,वाहतूक व्यवस्था,या सर्व बाबी वेगळे पणा दाखवितात जगात आपण फिरल्याशिवाय,पाहिल्याशिवाय,अनुभविल्याशिवाय, आपण कोण आहोत? आपली किंमत व कर्तुत्व या बाबी आपल्या लक्षात येत नाहीत असे मत ॲड एम एम मगर यांनी मांडले.
ते दुबई दौऱ्यानंतर माळशिरस येथे आपला युवक शेतकरी फोरमच्या पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत होते आपला युवक शेतकरी फोरम चे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड एम एम मगर हे फेब्रुवारी महिन्यात रियल इस्टेट काॅन्फरन्स साठी व दुबईतील उद्योग व्यवसायाची माहिती घेण्यासाठी दुबई ला गेले होते तेथुन परत आल्यावर माळशिरस येथे जेष्ठ नागरिक संघटने तर्फे त्यांचा सत्कार आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. दुबई दौऱ्यातील अनुभव सांगताना त्यांनी अनेक चमत्कारिक व नवनिर्मितीतुन अद्भभुत घडविता येते या बाबत माहिती दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की ,दुबई हे नवनिर्मीतीचे एक जागतिक केंद्र आहे. तिथे शिकण्यासारखे व करण्यासारखे बरेच आहे. वाळवंटात सर्व सोयीनी युक्त औद्योगिक नंदनवन तयार करणे म्हणजे दिव्यस्वप्नच असा विलक्षण अनुभव आपणास येतो. दुबई येथे जगातील प्रत्येक देशातील लोक विविध व्यवसाय, तंत्रज्ञानात गुंतलेले आपणाला दिसतील त्यातुनच दुबई घडली,आणि घडविली, दुबईचे मुख्य आकर्षण म्हणजे बुर्ज खलिप ही उंच इमारत आहे. ती दुबई ची ओळख आहे.828 मीटर उंच असणारी जगातील सर्वात उंच,देखणी व अद्यायवत तंत्रज्ञानाने तयार केलेली आहे.160 मजले,तेथील लिफ्ट,लाईट,बांधकाम,नक्षीकाम,सुरेख आकृती वैगरे बरीच वैशिष्ठे त्यात सामावलेली आहेत.
आपला युवक शेतकरी फोरमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक तरुणांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले असून या उद्योग व्यवसायासाठी आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड एम एम मगर यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले असून दुबई दौऱ्यातील त्यांच्या अनुभवाचा निश्चितच या युवकांना फायदा होणार आहे .