माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

रोटरी क्लबच्या अध्यपदी अनिल जाधव तर सचिव पदी विलास शिंदे यांची निवड

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथे रोटरी क्लब ऑफ सराटी डिलाईटच्या सन 2023 -24 च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी व पदग्रहण समारंभ संपन्न झाला यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून अनिल जाधव तर सचिव पदी विलास शिंदे यांची निवड करण्यात आली हा समारंभ जिल्हा गव्हर्नर शितल शहा यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक गव्हर्नर हनुमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मावळत्या अध्यक्षा स्वाती चंकेश्वरा यांनी नुतन अध्यक्ष अनिल जाधव यांना तर मावळते सचिव जगदिश कदम यांनी नुतन सचिव विलास शिंदे यांच्याकडे पदभार सोपविला.

नूतन अध्यक्ष अनिल जाधव
नूतन सचिव विलास शिंदे

नुतन उपाध्यक्षपदी अभिजित चंकेश्वरा,खजिनदारपदी संयुक्ता दोशी,सहसचिव मानसी कदम,आयटीपी स्वाती चंकेश्वरा,मेंबरशीप डायरेक्टर जगदीश कदम,विठ्ठलराव गायकवाड,डाॅ.मनिषा गांधी, मेघा जामदार,अमोलिक जामदार,आयटी नितीन दोशी, जनसंपर्क अधिकारीपदी प्रविण भोसले यांच्या निवडी करण्यात आल्या.तसेच नुतन सदस्य मृणाल दोशी,सौरभ वाघ,राजेश कोपर,शंकरराव शिंदे,महादेव पाटील,प्रशांत जाधव यांना मान्यरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गतवर्षीच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करणारे आदर्श जोडी जगदिश कदम व मानसी कदम,उत्कृष्ट रोटरी पुरुष विलास शिंदे ,उत्कृष्ट रोटरी महिला डाॅ.मनिषा गांधी यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा कार्यकारणीचे अजय दरेकर,पार्श्व परसोले रविकिरण खराड,इंदापुरचे नरेंद्र गांधी,आझाद पटेल,भोर क्लब अध्यक्षा सविता भोर,भिगवनचे रणजित भोंगळे,
अॅड प्रविण कारंडे,दिपक फडे,गजानन जवंजाळ,गौतम गांधी,ज्ञानेश्वर मोरे,रामलिंग सावळजकर,डाॅ.विश्वनाथ आवाड,नितीन बनकर,दर्शना गुजर,दत्तात्रय लिके आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार नुतन सचिव विलास शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!