निमगावच्या सुमित्रा पाणी वापर संस्थेची निवडणूक बिनविरोध
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 7 चे 1 ते 13 मधील तरतुदीस अनुसरून नीरा उजवा कालवा वरील वितरिका क्रमांक 65 वरील विमोचन क्रमांक 7 व 8 वरील सुमित्रा पाणी वापर संस्था निमगाव, ता माळशिरस जि. सोलापूर या संस्थेची सन दि. 4/7/2023 ते 5 /7/ 2029 या 6 वर्षाच्या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व 12 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत यामुळे संचालक मंडळाची समिती गठीत करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्याकडून परिपत्रक काढून देण्यात आली आहे .
निमगाव मधील ही पहिलीच पाणी वापर संस्था तर आहेच परंतु सर्वात मोठी पाणी वापर संस्था म्हणून या संस्थेचा उल्लेख केला जातो या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 650 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते 650 हेक्टर क्षेत्रांमधील 3 भाग करण्यात आले असून सर्वप्रथम वरच्या भागातून 4 संचालक ,मधल्या भागातून 4 संचालक तर शेवटच्या भागातून 4 संचालकाची नेमणूक करण्यात आली आहे तर या तीनही भागात एका महिला लाभधारक शेतकऱ्याची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून एका संचालकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रभाग निहाय बिनविरोध नियुक्ती झालेल्या संचालकाची नावे
सुरुवातीचा प्रभाग
1) सुजाता जयसिंग मगर महिला प्रतिनिधी
2)विश्वनाथ नानासाहेब मगर
3) गुलाबराव अजिनाथ मगर
4) विठ्ठल बापू तोरणे
मधला प्रभाग
1)सुवर्णा निनाद पाटील ,महिला प्रतिनिधी
2)संजय शिवाजी मगर
3)अजितराव हंसाजीराव पाटील
4)विलास बाळकृष्ण पाटील
शेवटचा प्रभाग
1)सुमन उत्तम मगर ,महिला प्रतिनिधी
2)कृष्णाराव अगतराव मगर पाटील
3)किरण वसंतराव मगर पाटील
4)सचिन बाबुराव मगर
या सर्व संचालकांमधून सुरुवातीस शेवटच्या प्रभागातील संचालकाची 2 वर्षासाठी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात येते तर सचिव म्हणून संचालकाव्यतिरिक्त व्यक्तीची नेमणूक करण्यात येते प्रत्येक प्रभागातील संचालकांना 2 वर्षासाठी चेअरमन पदाचा कार्यकाळ असतो मात्र टेल टू हेड या नियमानुसार या सुरुवातीस शेवटच्या प्रभागातील व्यक्तीस 2 वर्षासाठी चेअरमन होता येते
.