चांदापुरी – पठाणवस्तीमध्ये आठवडी बाजार सुरू

भूमीपुत्र न्यूज / रशिद शेख , चांदापुरी
माळशिरस तालुक्याच्या दक्षिणेकडील दुष्काळी पट्टा म्हणून संबोधल्या गेलेल्या चांदापुरी – पठाणवस्ती येथील लोकांच्या सोयींसाठी रविवार दि 25 जुन 2023 रोजी चांदापुरी – पठाणवस्ती चौकामध्ये आठवडी बाजाराचे उद्घाटन अकलुज क्रृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

चांदापुरी येथे सुरू असलेल्या ओंकार साखर कारखान्यामुळे या परिसरातील आर्थिक व व्यावसायिंक स्तरांवर आमुलाग्र बदल घडुन आले आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणावरची ऊसशेती ,मका, द्राक्षबागा याबरोबरच इतर शेतीमालाच्या भरघोस उत्पन्न घेतले जात आहे यामुळे या परिसरातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे परंतु या परिसरामध्ये लोकांना आठवडी बाजारासाठी शेजारील पिलीव, निमगाव, माळशिरस, खडूस आदी गावांमध्ये जावे लागत होते यामुळे वेळ श्रम व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत होते ही अडचण ओळखून पठाणवस्तीचे सरपंच एजाजभाई पठाण व चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ या दोघांनी मिळुन कृषी उत्पन्न बाजार समिती अकलुजकडुन बाजारासाठी मंजुरी मिळवली.
रविवार दिनांक 25 जून रोजी भरलेल्या बाजारात व्यापारी व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाणीचे व्यवहार झाले चांदापुरी – पठाणवस्ती येथील बाजाराचा लाभ चांदापुरी पठाणवस्ती सह शेजारील मगरवाड़ी, गारवाड ,तरंगफळ अनेक गावांना होणार आहे . पठाण वस्तीचे सरपंच एजाज पठाण व चांदापुरीचे सरपंच जयवंत सूळ यांच्या या कामाबद्दल जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे




