महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकीयसोलापूर जिल्हा

डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची मा आ राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट ,एक तास बंद दारा आड चर्चा

भूमीपुत्र न्यूज

काँग्रेसचे मा.जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवार दि 4 फेब्रुवारी रोजी सकाळी माजी आ राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन जवळपास एक तास बंद दरा आड चर्चा केल्याने अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत यावेळी मा आ राम सातपुते यांनी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला.

डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी मागील महिन्यात काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला यानंतर डॉ धवलसिंह मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार ? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या त्यातच डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी भेट देऊन जवळपास एक तास बंद दारा आड चर्चा केल्याने अनेक राजकीय तर्क वितर्क लढविले जात आहेत माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी आ रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी केल्यानंतर माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची व माजी आमदार राम सातपुते यांची भेट व चर्चा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

आगामी स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका त्याचबरोबर नातेपुते, माळशिरस, अकलूज महाळुंग नगर परिषदेच्या व नगरपंचायतीच्या निवडणुका या माध्यमातून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व माजी आमदार राम सातपुते यांच्यात झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात असून डॉ धवलसिंह मोहिते पाटील व माजी आमदार राम सातपुते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले तर सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आवाहन उभे करू शकतात असेही राजकीय जाणकारातून बोलले जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!