माळशिरस तालुका

चांदापूरी येथील तुषार खुर्द पाटील याचे अपघाती निधन

भूमीपुत्र न्यूज

चांदापुरी ता. माळशिरस येथील तुषार खुर्द-पाटील वय वर्ष 21 याचे शुक्रवार दि 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास मगरवाडी, गारवड हद्दीत ट्रॅक्टरला उठी लावत असताना ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडल्याने तुषार खुर्द पाटील याच्या अंगावरून उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली गेल्याने मृत्यू झाला आहे.

शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या स्वताचा ट्रॅक्टरची उसतोड मगरवाडी ,गारवड येथे सुरु होती तो ट्रॅक्टर भरुन आणत असताना उताराला उठी लावत असताना ट्रॉली अंगावर आली आणि यातच तुषार खुर्द पाटील यांचा मृत्यू झाला .ही घटना मगरवाडी-गारवाड हद्दित घडली आहे तुषार हा अत्यंत मनमिळावु स्वभावाचा होता त्याच्या या अचानक जाण्याने चांदापुरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!