फळवणी जवळ ट्रक चालकास दमदाटी करून लुटणाऱ्या टोळीस वेळापूर पोलिसांकडून अटक

भूमीपुत्र न्यूज
वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे फळवणी शिवारातील साळमुख ते सांगोला जाणाऱ्या रोडवरून वाहन चालक शुभम तिलोकसिंह यादव हे ट्रक घेऊन जात असताना फळवणी शिवारात कॅनॉल जवळ रोडवर तीन इसमानी मिळून वाहन अडवून वाहन चालकास शिवीगाळ दमदाटी करीत खाली ओढून हाताने मारहाण करून तुझ्याकडे असलेले पैसे काढून दे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन यादव यांच्या खिशातील 1300/-रुपये जबरदस्तीने काढून घेतले व सदर ट्रक चालकास लुटले ही माहिती वेळापूर पोलिसांना मिळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पोहोचले.

वेळापूर पोलिसांनी फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचा शोध घेतला असता सदर वर्णनाचे आरोपी साळमुख चौकात पोलिसांना पाहताच पळू लागल्यानंतर त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले याबाबत वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून नमूद गुन्ह्यातील आरोपी अजित सुभाषराव जाधव वय 28 वर्षे रा. मळोली, सुहास समाधान यादव वय 23 वर्षे, महेश विष्णू कदम वय 22 वर्ष दोघेही रा. तांदुळवाडी ता माळशिरस यांना अटक करून गुन्ह्यातील माल हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज डॉ बसवराज शिवपुजे वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय राऊत, उमाजी चव्हाण, पोलीस नाईक दीपक मेहकर, अमोल वाघमोडे यांनी ही कामगिरी केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत हे करीत आहेत .




