अकलूज उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज
“स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात; स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत,” असा प्रेरणादायी संदेश देणारे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ व ‘भारतरत्न’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अकलूज येथे विशेष सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, अकलूजचे अध्यक्ष अमर आदम शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. कलाम यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी व रुग्णांच्या सेवेसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“डॉ.कलाम यांचे विचार आणि कार्य आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सामाजिक भान जपत रुग्णांना फळवाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमर आदम शेख अध्यक्ष, भाजप अल्पसंख्याक मोर्चा, अकलूज
या सेवाभावी उपक्रमास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाडी व मोर्च्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. कलाम यांच्या स्मृतींस अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




