महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसोलापूर जिल्हा

शिक्षक दिन विशेष – शिक्षकांकडून शिकण्यासारख्या गोष्टी

भूमीपुत्र न्यूज

५ सप्टेंबर स्वतंत्र भारताचे दुसरे उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर शिक्षक दिन साजरा होतो.डॉ. राधाकृष्णन हे शिक्षक, तत्त्वज्ञ, भारतरत्न, आणि ‘एक परिपूर्ण शिक्षक’ म्हणून संपूर्ण जगाने गौरवलेले व्यक्तिमत्त्व.आदर्श शिक्षकच आदर्श विद्यार्थी घडवू शकतात.मग आपण शिक्षकांकडून नेमकं काय शिकायला हवं?


अभ्यासू वृत्ती – माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो!शिक्षकही नेहमी नवीन शिकत राहतात.ज्ञानदानाची आवड – स्वतःचं ज्ञान जपून न ठेवता विद्यार्थ्यांना देतात.कामावर निष्ठा – समोरच्याला समजलं का? याची खरी काळजी घेतात.माणूस घडवण्याचा वसा – फक्त अभ्यास नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडवणं हाच ध्यास.

तुम्हीही आज हे कराच
✅ आवडत्या शिक्षकांना भेटा
✅ त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करा
✅ पत्र लिहा किंवा छोटी मुलाखत घ्या
✅ शाळेनंतरही शिक्षकांना विसरू नका

🌍 तुम्हाला माहिती आहे का? भारतात ५ सप्टेंबर तर मलेशियात १६ मे, चीनमध्ये १० सप्टेंबर, ब्राझीलमध्ये १५ ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा होतो!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अजित मारुती भांगे
जि.प.प्राथ.शाळा,गुंडमाळीवस्ती आष्टी

ता.मोहोळ जि.सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!