आ.राम सातपुते शुक्रवार दि 30 जून रोजी मांडवे येथे भेटणार
भूमीपुत्र न्यूज
माळशिरसचे आ राम सातपुते यांच्या मातोश्री.जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दिनांक 26 जून रोजी अल्पशा आधाराने निधन झाले झाले. त्यांच्यावर मंगळवार दि 27 जून रोजी त्यांच्या मूळ गावी डोईठाण ता आष्टी जि बीड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आ राम सातपुते यांच्या मातोश्रीच्या निधनाने सातपुते परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो यासाठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा कृषी शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जाऊन आमदार राम सातपुते यांचे सांत्वन केले.
आ राम सातपुते यांच्या सांत्वन पर भेटीसाठी माळशिरस तालुक्यातून लोकांची डोईठाण ता आष्टी जि बीड या ठिकाणी रिघ लागली होती पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी सर्वसामान्यांना जवळपास 150 किलोमीटर लांबीचा पल्ला गाठणे अवघड असतानाही अनेकांनी त्या ठिकाणी जाऊन आ राम सातपुते यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले लांबचे अंतर व पावसाळ्याचे दिवस पाहता आ राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील लोकांना आवाहन केले आहे की,
माळशिरस मधील हितचिंतक नागरिक माझे व आमच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मला भेटू इच्छित आहे. आपल्या सर्वांच्या या प्रेमाबद्दल मी शुक्रवार दि. ३० जून २०२३ रोजी दिवसभर आपल्या भेटीसाठी मांडवे (माळशिरस )येथे असणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पावसाच्या या दिवसांत डोईठाण (बीड) कडे येण्याचा हा लांबचा प्रवास टाळावा, ही नम्र विनंती! आपल्या सर्वांच्या सद्भावना माझ्यासोबत आहेत, हा विश्वास मला आहे. तरी कृपया माझ्या विनंतीचा मान आपण ठेवाल, हीच नम्र अपेक्षा!
आ राम सातपुते