माळशिरस तालुकाराजकीय

डास, चिलटे, तोफा , रणगाडे व संताजी अन धनाजी सत्ताधाऱ्यांचा हल्ला

साला एकही मच्छर तुम्हारे पॅनल को हिजडा बना देगा / उत्तम जानकर
विरोधकांचा प्रति हल्ला…

भूमीपुत्र न्यूज

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरुद्ध विरोधी माळशिरस तालुका विकास आघाडी पॅनल च्या माध्यमातून सरळ दुरंगी लढत होत आहे सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील गटाने प्रचारात आघाडी घेतली असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अगोदरच प्रचाराचा नारळ फोडला असून शिवरत्न वर झालेल्या सभेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता.

विजयसिंह मोहिते पाटील पॅनलच्या शुभारंभाच्या सभेत चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातून मोहिते पाटील कुटुंबातील एकानेही अर्ज का भरला नाही याचे उत्तर देताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले होते की ,समोरून कोणीही उमेदवार असले तरीही डास व चिलटे मारण्यासाठी तोफा व रणगाड्यांची आवश्यकता सत्ताधाऱ्यांना नाही विरोधी गटातील उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते खंबीर आहेत यामुळे डास चिलटे तोफा रणगाडे आणि मोहिते पाटील यांचे संताजी आणि धनाजी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हाभर चर्चेत आले.

याच सभेत आ राम सातपुते यांनी विरोधकांना एकही संस्था नीट चालवता आली नाही असा टोला लगावला होता त्यास माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी प्रत्युत्तर देताना त्यांचेच परममित्र व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य के के पाटील यांनी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल कडून बोलताना सांगितले की ,स्वतःच्या स्वार्थासाठी सहकारी संस्थांचा वापर करून स्वतःचा प्रपंचा नेटका केला असा सत्ताधाऱ्यांना टोला तर लगावलाच पण आपले परममित्र आ राम सातपुते यांना त्यांच्याच डायलॉगची आठवण करून देत राजा का बेटा राजा नही होता जो असली हकदार होता है वो ही राजा होता है या डायलॉग ची आठवण करून देत कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता या निवडणुकीत विरोधकांना मिळेल असा आशावाद व्यक्त केला

संपूर्ण महाराष्ट्रभर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक असणारी ही बाजार समिती सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापाई मोडकळीस आणली असून जनावरांचा बाजारही मोडकळीस आला असून शेतकरी व बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या 18 च्या 18 उमेदवारांना विजयी करावे
पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, उमेदवार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती

विरोधकांना डास व चिलटे संबोधणाऱ्या चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या डायलॉगला प्रति डायलॉग ने उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर म्हणाले की साला एकही मच्छर तुम्हारे पॅनल को हिजडा बना देगा विजयाची खात्री माझ्या मनामध्ये झाली आहे फक्त ती आमच्या कार्यकर्त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे यावेळी निश्चित परिवर्तन होणार आहे जिपचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील व डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या साथीने सर्व मतदार बंधू भगिनी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकणार
उत्तम जानकर उमेदवार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती

बाजार समितीची निवडणूक येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, विधानसभा,लोकसभा निवडणुकीला दिशा देणारी निवडणूक असून या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणायच असेल तर शेतकरी विकास आघाडीला मतदान करा शेतकरी कष्टकर्याला दिलासा देण्याच काम बाजार समितीच्या माध्यमातून झालेले नाही.बाजार समितीच्या माध्यमातून एकाधिकारशाही निर्माण झाली असुन सर्वसामान्य सभासद उपेक्षित राहिला आहे.आजपर्य॔त मार्केट कमिटीने सभासदांच्या हितासाठी काहीही केले नाही.सत्ता आल्यास मार्केट कमिटी भ्रष्टाचार मुक्त व लोकशाही पद्धतीने कारभार करू.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!