महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकिय

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी गट व गणवाईज सभा घेणार / सतीश पालकर

भूमीपुत्र न्यूज

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत आदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर 9 दिवसानंतर राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 24 तासाच्या आतच त्यांची खासदारकी रद्द केली व सरकारी घर खाली करण्याची नोटीसही पाठवली मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गण व गटात सभा घेऊन जनजागृती करणार असल्याचे मत काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष सतीश पालकर यांनी मांडले.

ते अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, भारत मगर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख ,अकलूज शहराध्यक्ष नवनाथ साठे, युवक काँग्रेसचे मयूर माने ,शैला गोसावी ,तय्यब मौलाना, मोशीन बागवान, केशव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? या संदर्भातील राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत आदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला परंतु या दोघांच्या भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला याचबरोबर अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली असताना मोदी सरकारने संसदेचे कामकाज चालू दिले नाही उद्योगपती अदानीला वाचविण्यासाठी मोदी सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे असाही आरोप करण्यात आला.

तर सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले मोदी सरकारमधील मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले त्यावर राहुल गांधी यांनी संसदेत उत्तर देण्याची तयारी दाखवली पण त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपकडून धंदात खोटा आरोप केला जात आहे भाजपा ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचाऱ्यांशी जोडून ओबीसी समाजाचा अपमान करीत आहे यामुळे लोकशाही , संविधान आणि देश वाचविण्यासाठी ही लढाई सुरू असून काँग्रेस ही लढाई जनता दरबारात लढेल व विजयी होईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला याचबरोबर वाढत्या महागाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई विरोधात तालुक्यातून पोस्टकार्ड पत्र पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!