महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

टेंभुर्णी,बार्शी व इंदापूर येथे सिने कलाकार गश्मीर महाजनी यांच्या उपस्थितीत “एक राधा एक मीरा” चित्रपटाचे प्रमोशन धुमधडाक्यात संपन्न

भूमीपुत्र न्यूज

गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत असलेला व महेश मांजरेकर निर्देशक असलेल्या मराठी चित्रपट “एक राधा एक मीरा” व्हॅलेंटाईन वीक चा मुहूर्त साधून 7 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रसिद्ध झाला आहे या चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार गश्मीर महाजनी ,मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले या कलाकारांसह आदींनी भूमिका या चित्रपटात सादर केली असून हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला चांगले रेटिंग प्राप्त झाले आहे.

कलाकार गश्मीर महाजनी यांच्या उपस्थितीत स्पेशल शो टेंभुर्णी, इंदापूर, बार्शी या ठिकाणी संपन्न झाला .सुमन मल्टिप्लेक्स टेंभुर्णी, छत्रपती सिनेमा बार्शी व राहुल थिएटर इंदापूर चित्रपटगृहात येथे गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिकेत हा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्यासोबत पाहण्याची संधी प्राप्त झाली हा शो प्रेक्षक Book My Show वर बुक करून सेलिब्रिटींना भेटण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रेक्षकांनी पिंक रेवोल्युशन च्या माध्यमातून आयोजक डॉ. श्रद्धा जवंजाळ व डॉ. कविता कांबळे,अमोलिका जामदार,समर्थ आयव्हीएफ व कृष्णा कार्डियाक मॅटरनिटी केअर करमाळा यांनी दिली त्याबद्दल सर्वच प्रेक्षकांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!