महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकियसोलापूर जिल्हा

मा खा रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते यांचा पाठपुरावा;भाजप सरकार मुळे माळशिरस च्या दुष्काळी गावांना मिळणार पाणी / शिवराज पुकळे

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असा कलंक असलेल्या गावांना नीरा देवघर धरणाचे हक्काचे पाणी लवकरच मिळणार असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे माळशिरस तालुक्यातील गावांसाठी मूळ प्रकल्पातील 967 कोटीचे टेंडर निघाले असून एक महिन्याच्या आत कारुंडे ता माळशिरस येथे काम सुरू होणार असल्याची माहिती नीरा देवघर पाण्यासाठी संघर्ष करणारे सक्रिय कार्यकर्ते शिवराज पुकळे यांनी भूमीपुत्र न्यूज शी बोलताना दिली.याप्रसंगी भाजप नेते राहुल मदने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवराज पुकळे म्हणाले,सन २००० ते सन 2023 या काळात तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे निरा देवघर चे एक फूट ही काम झाले नाही ,माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती आली,प्रकल्पासाठी एकूण मंजूर सुप्रमा 397 6.83 कोटी रुपये खर्च असुन 2024 अखेर प्रकल्पासाठी एकूण खर्च 918.29 कोटी एवढ्या रकमेचे काम पुर्ण झाले आहे. 967.74 कोटी रुपयाचे नवीन टेंडर निघाले असून त्याची वर्क ऑर्डर मे 2025 मध्येच झाली आहे.यामध्ये एक महिन्याच्या आत माळशिरस तालुक्यापर्यंतचे काम होणार आहे.

माळशिरस तालुक्यातील नव्याने समाविष्ट गावांच्या कामासाठी उपसा सिंचन योजना होणार असल्याची माहिती शिवराज पुकळे यांनी भूमीपुत्र न्यूज शी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!