महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

“वाहतुकीचे नियम पाळा,अपघात टाळा” अकलूजमध्ये आरटीओ आणि पोलिसांची भव्य रॅली”

भूमीपुत्र न्यूज

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज व पोलीस ठाणे, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत “हेल्मेट, सीटबेल्ट व सुरक्षित विद्यार्थी वाहतूक” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस उप-अधीक्षक संतोष वाळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

अकलूज शहरातून मार्गक्रमण करताना रॅलीमध्ये “वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा”, “येईल शाळा, वाट द्या बाळा”, “वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका” आणि “वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा” अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत हेल्मेट परिधान केलेले दुचाकीस्वार, सीटबेल्ट लावलेले चारचाकी चालक आणि सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

या रॅलीमध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय, श्रीराम शिक्षण संस्था पाणीव, शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांसह ड्रायव्हिंग स्कूल संचालक, चालक-मालक प्रतिनिधी संघ, सोनाज हिरो आणि नष्टे होंडाचे कर्मचारी सहभागी झाले होते.याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक सातपुते, झाडबुके, पाटील, राऊत, मावळ, घुले, सावंत तसेच पोलीस अधिकारी साळुंखे, वनवे, रेगुडे आणि दोन्ही विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या माध्यमातून अकलूजकरांना रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!