निमगाव येथे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ‘शैक्षणिक सहल व हुरडा पार्टी’ संपन्न

भूमीपुत्र न्यूज/नितीन मगर
जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत माळशिरस तालुक्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपणारे गाव निमगाव येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी भव्य शैक्षणिक सहल व हुरडा पार्टीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

पी.एम.श्री.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २१० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत निसर्ग आणि शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. दिवसाची सुरुवात शिवारफेरीने झाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना केळी आणि द्राक्ष बागेची तांत्रिक देण्यात आली मुलांनी पालखी मार्गाने भ्रमंती करत ऊस,मका शेती आणि ओढा प्रणालीचा अभ्यास केला, तसेच विकास मगर यांच्या बोरीच्या बागेत बोर खाण्याचा मनमुराद आनंद लुटला. धार्मिक व सांस्कृतिक अभ्यासाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी श्री खंडोबा मंदिर व आई येल्लमा देवी मंदिराला भेट दिली, जिथे त्यांना मंदिराचे महात्म्य आणि परंपरांची माहिती मिळाली. दुपारच्या सत्रात पर्यटन समितीच्या सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने सर्व पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.

यावेळी मार्गदर्शक रमेश खळतकर सर आणि नितीन सुकळीकर सर यांनी निमगाव गावाची पर्यटन विकासासाठी झालेली निवड आणि भविष्यातील कृषी पर्यटनाचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. माणदेशी फाउंडेशनच्या वतीने ‘सॉईल सखी’ उपक्रमांतर्गत माती परीक्षणाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कलागुण सादर करत सांस्कृतिक गीते गायली, तसेच आयोजित केलेल्या अंकांच्या खेळात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास रावसाहेब आप्पा मगर,माजी सरपंच श्रीमंत मगर ॲड.डी. के.पाटील,उपसरपंच नंदकुमार पाटील,किरण पाटील,पत्रकार निनाद पाटील,पत्रकार भारत मगर,पत्रकार नितीन मगर,विकास मगर, विजय मगर, सोमनाथ मगर, बिबीशन कदम,प्रवीण मगर शासकीय अधिकारी,शिक्षक आणि ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.उकडलेली मका कणसे, साजूक तुपातील शिरा आणि अस्सल गावरान जेवणाच्या मेजवानीने या उपक्रमाची यशस्वी सांगता झाली, ज्यामुळे पर्यटनासोबतच शालेय शिक्षणाला एक नवी दिशा मिळाली.




