माळशिरस तालुकाराजकिय

माळशिरस तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पहा कोणत्या गावचा कधी होणार उपसरपंच ?

भूमीपुत्र न्यूज

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका 18 डिसेंबर रोजी पार पडल्या असून या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 20 डिसेंबर 2022 रोजी अंतिम निवडणूक निकाल जाहीर करण्यात आलेला होता यानुसार माळशिरस तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये निवडणूक निरीक्षक यांनी नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या नेमून दिलेल्या तारखे दिवशी उपसरपंच पदाची निवड करणार आहेत.

यानुसार शुक्रवार 6 जानेवारी 2023 रोजी वेळापूर, चौंडेश्वरवाडी, संगम, कोळेगाव, उघडेवाडी ,मोटेवाडी (मा) ,सदाशिवनगर, उंबरे दहिगाव, पुरंदावडे,काळमवाडी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत.

सोमवार 9 जानेवारी 2023 रोजी पिसेवाडी, जांभूड, माळेवाडी (बो),फळवणी, धानोरे, आनंदनगर, नेवरे, मारकडवाडी, चांदापुरी, गुरसाळे ,तरंगफळ, लोंढे मोहितेवाडी, मेडद ,तामशीदवाडी, खंडाळी दत्तनगर, व तिरवंडी या गावच्या उपसरपंच पदाची निवडी होणार आहेत.

मंगळवार 10 जानेवारी 2023 रोजी निमगाव ,पानीव घुले नगर, बागेचीवाडी, यशवंतनगर ,पळसमंडळ ,पठाणवस्ती, तांबेवाडी इस्लामपूर, व कचरेवाडी या गावच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत .लोकनियुक्त सरपंच या सभेचे अध्यक्ष असणारा असून त्यांच्या सहीने ग्राम विकास अधिकारी हे नूतन सदस्यांना उपसरपंच निवडीसाठी नोटिसा देणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!