कोळेगांव येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकहितवादी आणि गतिमान नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत, माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असून, विरोधी पक्षांना हा मोठा धक्का मानला जात आहे.हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.नवनियुक्त कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून,त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.” उपमुख्यमंतत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या विकासकामांचा धडाका पाहून तळागाळातील कार्यकर्ता शिवसेनेकडे आकर्षित होत आहे.
कोळेगांव येथील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे,” असे मत यावेळी सभापती दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केले.पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामांवर विश्वास ठेवून कोळेगाव येथील खालील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कोळेगांव येथील युवक नेते प्रवीण शशिकांत सावंत, नामदेव हनुमंत सावंत,अनिल तानाजी सावंत,गणेश दुपडे,संतोष सावंत, बालाजी सावंत,सचिन सावंत, अजय चव्हाण,शिवतेज पारसे,गणेश दुपडे,कुणाल दुपडे,बाबुराव सावंत,राहुल सावंत,रणजित दुपडे, कन्हैया होनमाने, बापूराव दुपडे,सागर सावंत,जय सावंत योगेश सावंत,मारुती सावंत विक्रम सावंत, माऊली सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
“महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे आणि माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही सर्वांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोळेगाव आणि संपूर्ण परिसरात शिवसेनेचा भगवा अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण जोमाने काम करू असे युवक नेते प्रवीण सावंत यांनी सांगितले.
“या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे कोळेगाव आणि माळशिरस तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नवनवीन कार्यकर्त्यांचा शिवसेनेतील ओघ येत्या काळात असाच सुरू राहील, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्याला परिसरातील अनेक नागरिक आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




