वेळापूर पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन करे यांच्या प्रसंगावधानाने शिंगणापूर घाटात वाचले 50 भाविकांचे प्राण
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील महादेवाची यात्रा व कावडी उत्सव असल्याने या कार्यक्रमाला भाविकांची महाराष्ट्रातून मोठी गर्दी झाली होती.
शनिवार दि. 1एप्रिल वेळ सायंकाळी 7 वा सुमारास शिंगणापूर एसटी स्टँड वरून शिंगणापूर यात्रा स्पेशल अशी एसटी मध्ये ५० प्रवासी भरून व एसटीवर देवाची कावडी ठेवून परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर कडे निघालेल्या एसटी ही शिंगणापूर घाटातील शेवटच्या वळणावर आली असता, ती एसटी वळण घेत असताना तिचा एअर ब्रेक फेल झाल्याने ती एसटी रोडच्या संरक्षणासाठी असणारे कठडे आहेत त्या कठड्याला सदरची एसटी धडकण्याच्या स्थितीत असतानाच त्यावेळेस तेथे कर्तव्यावर हजर असणारे वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जनार्दन करे यांच्या ही घटना क्षणात लक्षात आल्याने त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ कठड्याजवळ असलेला मोठा दगड उचलून एसटीच्या पाठीमागील चाकाच्या पुढे लावल्याने सदरची एसटी कठड्याला न धडकता जागेवरच थांबल्याने अपघाताचा अनर्थ तळल्याने एसटीतील 50 भाविकांचे प्राण वाचले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन करे यांच्या हजर जबाबी कर्तव्यपणाबद्दल त्यांचे एसटीतील भाविकांनी उतरून आभार मानले. सदरची एसटी एअर ब्रेक फेल झाल्याने गाडी रोडवर आडवी उभी राहील्याने शिंगणापूर ते नातेपुते एक तास वाहतूक बंद पडली होती. नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील दोन वळणावरील नेमणुकीस असलेले वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस नाईक देशपांडे, पोलीस कॉन्स्टेबल माळी, पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार यांना बोलावून घेऊन सदरची वाहतूक सुरळीत केली.शिंगणापूर यात्रा महोत्सवाच्या काळात पोलीस कर्मचारी जनार्दन करे यांनी चांगले काम करून 50 प्रवाशांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांना वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन करे यांच्या या कामाची माहिती मिळताच जनार्दन करे यांचा वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सन्मान करून केलेल्या कामाच्या कौतुकाची शाबासकी देऊन अभिनंदन करण्यात आले .