राजेवाडी कारखान्याच्या बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करा, युवा सेनेचे पिलीव पोलिसांना निवेदन
भूमीपुत्र न्यूज
राजेवाडी कारखान्याचे ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हर बेशिस्त पणे वाहन चालवित असून नुकतीच ट्रॅक्टर चालकाच्या बेशिस्तपणामुळे जीवितहानी झाली आहे .यामुळे पिलीव पोलीस प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कारवाई करावी या आशयाचे निवेदन युवासेना माळशिरस तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वात पिलीव पोलिसांना देण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की , ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक कर्ण कर्कश आवाजात गाणी लावतात यामुळे चालकाचे लक्ष नसल्याने अपघात होत आहेत यावर पोलीस प्रशासनाने नियंत्रण ठेऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करावी अशी विनंती केली आहे. यावेळी निवेदन देताना युवासेना माळशिरस तालुका उप प्रमुख डॉ. निलेश कांबळे, शिवसैनिक योगेश देशमुख, प्रा. शंकर शिंदे , महेश देशमुख, प्रभाकर माने, मंगेश लोखंडे, संतोष झेंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते